कालची गोष्ट. दुपारी आजी येणार हे ऎकल्यावर सकाळपासुन वाट बघुन कंटाळून गेलेल्या सईला “बाहेरची गंमत दाखवतो” म्हणुन कडेवर घेतलं आणि खिडकी उघडली तर अचानक अंधारुन आलं. “नभ मेघांनी आक्रमिले” देखील झाले न्हवते. “मग ही काय गडबड?” म्हणेस्तवर शेजारच्या इमारतीमधुन धुराचे लोट बाहेर पडताना दिसले. “बापरे आग!” म्हणेस्तोवर अग्निशामकदलाच्या गाड्यांचा आवाज घुमु लागला.
आमची सोसायटी म्हणजे तसं अजस्त्र प्रकरण आहे. मी राहतो ११ व्या मजल्यावर. इमारती ला मजले १४, प्रत्येक मजल्यावर जवळ जवळ ६० एक घरे. आणि अशाच ७ इमारती एकाच संकुलात. त्यात परत घरात सगळी जपानी पद्धतीची बांधणी. खाली फ़्लोरिंग लाकडी, सरकते दरवाजे, भिंतीतली कपाटे (काय पुणेरी शब्द आहे) सगळं लाकडी, त्यात परत गॅसची पाइपलाइन सगळीकडे फ़िरलेली. शिवाय हिवळ्यामुळे बहुतेक सगळ्यांकडे हीटर साठी केरोसीन चा साठा. त्यामुळे इथल्या इमारतीतुन चुकुन जरी अलार्म वाजला तर भॅयभॅय करत ५ गाड्या येतात. आज तर चक्क धुराचे लोट आणि बरोबरीला आगिच्या ज्वाळा बाहेरुन पण दिसत होत्या. ६ व्या मिनिटाला पहिली गाडी इमारतीसमोर उभी, हा हा म्हणता म्हणता आणखी १४ गाड्या आजुबाजुला सज्ज. सई हेरिकोपुता- हेरिकोपुता- म्हणतेय तोवर अग्निशमन दलाचे helicopter बरोबर आमच्या संकुलाच्या वर तरंगत थांबलेलं. म्हणजे एकदम stand-by. अग्निशमन दलाची क्रेन ७व्या मजल्यापर्यंत चढतेय तोवर TV वाल्यांची पण 4-5 Helicopters आकाशात भराभरा गोळा झालेली. ह्या पत्रकारांना कुठुन लगेच वास लागतो कोण जाणे. आहो खाली बघितलं तर मॆदानात उभ्या असलेल्या बघ्यांच्या मुलाखती पण चालु झालेल्या…
To be continuted.
फेब्रुवारी 26, 2009 at 11:59 pm |
असं अर्धवट का लिहिता हो? उगिच उत्सुकता चाळवते ना… पुढे काय झालं असेल म्हणुन..
सप्टेंबर 1, 2009 at 3:49 pm |
ती हेरिकोपुता आणि अग्निशमन दलाच्या गाड्या सोडल्या तर पत्रकार सगळीकडेच असे फास्ट पोचतात!