आजीला, म्हणजे बाबांच्या आईला मी लहानपणापासुन ओळखतो. म्हणजे माझ्या लहानपणापसुन बरंका (उगाच गॆरसमज नको). कधी मोठ्या काकांच्या घरी, कधी मधल्या काकांकडे, कधी आत्याकडे गोव्याला, तर कधी आमच्याकडे, असा आजीचा वर्षभर प्रवास चालु असतो. या वयात तीने इतकी दगदग करु नये असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. पण ती कधी कुठेच एका जागी फ़ार रमत नाही. आणि दर थोड्या दिवसांनी नातवंडानां अनं आता पंतवंडाना परत भेटावं अस तीला वाटु लागतं आणि तीचा मुक्काम हालतो. तर अशी ही आमची आजी, बहुदा तुम्हा सगळ्यांच्या आजीशी साम्य असलेली.
आज अचानक आजीची आठवण होण्याचे कारण म्हणजे हा फ़ॉर्म, वॉर्ड ऑफ़िस ने पाठवलेला. आई-बाबा-आजी वगेरे सगळी माहिती भरायची होती. आईची माहिती भरायला काही प्रोब्लेम नाही आला. गंमत सुरु झाली बाबांपासुन. त्यांच्या आहेत दोन दोन जन्म तारखा, एक खरा (बहुतेक) जन्मदिवस अनं एक शाळेच्या दाखल्यावरचा, मास्तरांनी भरलेला. असे का? तर म्हणे, त्यावेळी खेडेगावात शाळेत घालताना जन्मतारीख वगेरे सांगत बसायला पालकांना कुठला वेळ! मग मास्तरच तारीख भरुन मोकळे होत असत. त्यामुळे बाबांच्या वर्गातील बहुतेक सर्व मुलांची जन्मतारीख १ मार्च किंवा २ मार्च.
तो पण घोळ उरकला, आता आजीची पाळी. अरे बापरे, आजीचा जन्मदिन कुणाला ठाउकेय! Happy B’day वगेरेच फ़ॅड तीच्या पंतवंडांपासुन चालु झालेले. लावला लगेच फ़ोन आईला. नशिबाने आईच्या लक्षात होती. त्यामुळे पट्कन तारीख लिहुन घेतली आणि थेट वॉर्ड ~ऒफ़िस गाठलं. पण फ़ॉर्म भरता भरता एका कॉलम ने घोळ केला…… नाव – आजीचे नाव कोणाला माहितीये
लहानपणापासुन मी आजीला आजी म्हणुनच ओळखतो. आणि आजीच्या नावाचा कधी कुठे उल्लेख यायचा प्रसंगही नाही. आता आली का पंचाइत. खुप आठवायचा प्रयत्न केला. शेवटी माझ्या काकांनी सांगितलेला एक विनोद आठवला… आजीला म्हणे एकदा तीच्या मामाचे पत्र आले.. वरती लिहिले होते – “आंबुस गोड आशिर्वाद”
म्हणजे Sweet-n-Sour Blessings नाही बरं! आंबु म्हणजे - अंबा - आजीचे नाव…… हुर्रे हुर्रे - आजी चे नाव समजले….. हुश्श्य!!!
या सगळ्या भानगडीत आपल्याला आपल्या आजीचे नाव आणि जन्मतारीख माहित नसावी याचे मला फ़ार वाइट वाटलं. तुमच्यापॆकी किती जणांना तुमच्या आजीचे नाव आणि जन्मतारीख लगेच आठवते???
नोव्हेंबर 21, 2008 at 3:46 pm |
hmm.. kharraach ek (uttar) na athavanaara (kiva muttar mahit nasnaara) prashna ahe (kadachit phakta mazyasathi ch mahit nasnaara) ha.
mala nahi mahit mazya aaji che naav (aaichi aai / babanchi aai).