माझ्याविषयी थोडेसे

By shimajiro

नमस्कार मंडळी,

इंटरनेट च्या महाजालातील (खरंतर मायाजाल?) माझ्या या रोजनिशीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

मी शितल सेवेकरी. मुळचा पुण्याचा. म्हणजे तसा जन्म माझा सोलापुर जिल्ह्यातल्या बार्शी चा आहे. पण इयत्ता ५वी पासुन मुळा-मुठेचे पाणी पिउन वाढलो (”अरे किती वाढलायस!?” असं माझी मामी नेहमी म्हणते – असो) त्यामुळे पुणेरीपणा चांगलाच अंगवळणी पडलाय.

फ़र्गसन महाविद्यालयातुन भुगर्भशास्त्राची पदवी पदरी पाडुन (कशीबशी) झाल्यावर, गम्मत म्हणुन रानडे इन्स्टिट्युट मधे जपानी भाषा शिकलो. आज त्या गमतीच्या जोरावरच रोजिरोटी चालु आहे. नाहितर मला कसली टोक्यो ला यायची संधी मिळतेय. तसा मुलीचा हात मागयला लग्नाआधी एकदा आलो होतो. पण लग्नानंतर लगेच नोकरी बदलली आणि जपान मधे रहायची संधी पण मिळाली.

काय म्हणालात? “कसं आहे टोक्य़ो?” आहो एकदम झकास. सोयी सवलती तर इतक्या आहेत की माझ्या सारख्या अस्सल पुणेरी माणसाला पण नाव ठेवायला जागा नाहि कुठे. म्हणुन मग “सोयी जरा जास्तच आहेत – ह्याची काही गरज न्हवती – हे असे असले की यंत्रांच्या जगात माणुस हरवला आहे.” वगेरे वगेरे अधुन मधुन पुट्पुट्ले कि झाले, पुणेरी पणावर डाग नको, नाहि का? :-)

अरे अरे – बरीच सरमिसळ झालेली दिसतेय. आहो विचारांची गर्दी झाली कि झालीच तयार - ”बेडेकर मिसळ-पाव” – अस्सल पुणेरी.. 

Tags: , , , , , ,

उत्तर नोंदवा